नाशिक येथे गणेशोत्सव मंडळांना अनुमती शुल्क माफ !
महापालिकेची नवीन नियमावली घोषित !
नाशिक – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सार्वजनिक गणेशोत्सव २०२२ साठी महापालिकेच्या जागांवर उभारणी केलेले मंडप, व्यासपीठ आणि कमान यांचे परवाना शुल्क माफ करण्याविषयी सर्व महानगरपालिकांना निर्देश दिले होते. त्यानुसार येथील महानगरपालिकेचे प्रशासक तथा आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी महापालिकेची सुधारित नियमावली घोषित केली आहे. आयुक्तांनी गणेशोत्सव मंडळांसाठी परवाना शुल्क माफ करण्याचा निर्णय २० ऑगस्ट या दिवशी घेतला असून महापालिकेत तसा ठराव करण्यात आला आहे.