पुणे येथील ‘ससून’च्या अधिष्ठात्यांनी मारहाण केल्याचा आधुनिक वैद्यांचा आरोप !
पुणे – येथील ससून सर्वोपचार रुग्णालयामध्ये साहाय्यक प्राध्यापक हृदयशस्त्रक्रिया विभाग या पदासाठी काही मासांपूर्वी आधुनिक वैद्य ज्ञानेश्वर बोराडे यांनी मुलाखत दिली होती. त्याविषयी चौकशी करण्यासाठी गेलेल्या बोराडे यांना मुख्य प्रशासकीय अधिकार्यांनी मारहाण केली. बोराडे यांनी तक्रार प्रविष्ट केली. त्यावर पोलिसांनी कारवाई केली नाही. ‘आपल्यावर अन्याय होत आहे’, अशी भावना बोराडे यांनी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘‘मुलाखत दिल्यानंतर मी पात्र असूनही मुख्य अधिष्ठाता आधुनिक वैद्य विनायक काळे आणि आधुनिक वैद्य नित्यानंद ठाकूर यांनी मला अपात्र ठरवले. मुलाखत घेणारे ठाकूर हे बोगस प्राध्यापक आहेत. त्यांची मान्यता महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापिठाने काढून घेतली आहे. तरीही काळे यांनी वर्ष २०१३ पासून त्यांना साहाय्यक प्राध्यापक म्हणून कार्यरत ठेवले आहे.’’