हरिहरेश्वर समुद्रकिनार्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीत २ तलवारी आणि चाकूही सापडले !
हरिहरेश्वर – येथील समुद्रकिनार्यावर सापडलेल्या संशयास्पद बोटीत आधी एके – ४७ बंदूक आणि ६०० हून अधिक जिवंत काडतुसे सापडली होती; मात्र बोटीच्या अधिकच्या पडताळणीत २ तलवारी आणि चाकूही सापडले आहेत. या घटनेनंतर कोकण आणि पुणे येथे सतर्कतेची चेतावणी देण्यात आली आहे. परिसरातील हॉटेल आणि लॉज येथे पोलिसांनी धाडी टाकून संशयितांची चौकशी चालू केली आहे. संशयास्पद व्यक्तींची माहिती देण्याचे आवाहनही केले आहे. गोवा आणि सिंधुदुर्ग येथे बाहेरून येणार्या प्रत्येक वाहनाची पडताळणी केली जात आहे.
Maharashtra: Suspicious boat carrying weapons including AK-47 found abandoned along the Raigad coast, high alert sounded https://t.co/BhJFTsSPfl
— OpIndia.com (@OpIndia_com) August 18, 2022
समुद्रकिनारीही पहारा दिला जात आहे. होड्या किनार्यावर येणार्या भागातही पहारा वाढवला आहे. संशयास्पद होड्यांची पडताळणी केली जात असून स्थानिक मच्छिमार, तटरक्षक दल आणि वॉर्डन यांनाही सतर्क रहाण्याचे आदेश देण्यात आले आहेत.