हिंदूंवरील जिहादी आक्रमणे आणि ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’चा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात खोपोली येथे ‘हिंदु राष्ट्र जागृती आंदोलन’ !
रायगड, २० ऑगस्ट (वार्ता.) – हिंदूंच्या हत्या, जिहादी आक्रमणे आणि महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचा ‘धार्मिक पक्षपात’ यांविरोधात हिंदु जनजागृती समितीच्या वतीने शिळफाटा, खोपोली येथील श्री छत्रपती शिवाजी महाराज स्मारकासमोर २० ऑगस्ट या दिवशी आंदोलन करण्यात आले.
‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ केवळ हिंदूंच्या विरोधात एकतर्फी कारवाई करत आहे. याला उत्तरदायी असलेल्या ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या संबंधित सर्व अधिकार्यांना निलंबित करा, तसेच देशभरात होणार्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणेकडे (NIA) देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी’, या मागण्या आंदोलनात करण्यात आल्या.
सामाजिक कार्यकर्ते श्री. राजेंद्र पाटील आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. प्रसाद वडके यांनी आंदोलनाला संबोधित केले. मागण्यांच निवेदन तहसीलदार आणि जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.