हिंदु सणांच्या काळात उगवणारे कथित पर्यावरणवादी !
श्री गणेशचतुर्थी आणि दिवाळी आली की, पावसाळ्यात जशा भूछत्र्या उगवतात, त्याप्रमाणे अचानक उगवणारे पर्यावरणवादी बाहेर पडतात. वर्षातून केवळ ११ दिवसच असणार्या गणेशोत्सवाच्या काळात डॉल्बी ध्वनीक्षेपकाचा त्रास होतो म्हणणारे आणि तेव्हाच ध्वनीप्रदूषण आठवणारे वर्षभर मशिदींवरील लाऊडस्पीकरमधून कानठळ्या बसवणार्या अजानला ते जणू अंगाईगीतच मानतात. मशिदीवरील भोंग्याच्या आवाजाने अजिबात ध्वनीप्रदूषण होत नाही, हे मोठे आश्चर्यच आहे !
पंचगंगेच्या पात्रात ३ वेळा मासे मरण्याला हिंदूंचे उत्सव दोषी आहेत का ?
श्री गणेशमूर्तीच्या विसर्जनामुळे जलप्रदूषण होते; मग मोहरमच्या ताबुतांच्या विसर्जनातून पंचगंगा नदी (कोल्हापूर जिल्ह्यातील नदी) शुद्ध आणि पवित्र होते का ? गेल्या ४ मासांत हिंदूंचे होळी-गणेशोत्सव-दिवाळी हे सण नसतांना पंचगंगेच्या पात्रात ३ वेळा मासे मरून पडल्याची घटना घडली. या घटनेलाही रासायनिक सांडपाणी सोडणारे कारखाने नाही, तर गणेशोत्सव आणि श्री गणेशमूर्ती विसर्जनासारखे उत्सव साजरे करणारे हिंदूच दोषी आहेत का ?
प्रदूषण पुरोगाम्यांनाच त्रासदायक कसे ठरते ?
‘जर महानगरपालिका एकाच पंचगंगेतून पाणी उचलून, एकाच शुद्धीकरण केंद्रात ते शुद्ध करून सर्व कोल्हापूरकरांच्या घरात पाठवते, तर ते पुरोगाम्यांच्या घरी जातांना अशुद्ध आणि इतरांच्या घरी जातांना शुद्ध होते’, असा काही प्रकार होत असल्यास त्यावर निश्चित संशोधन करायला हवे !
(साभार : सामाजिक माध्यम)