(म्हणे) ‘त्यांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) गांधींना मारले, ते मला सोडतील का ?’
काँग्रेसचे नेते सिद्धरामय्या यांचा त्यांना ठार मारण्याची धमकी आल्याचा दावा !
बेंगळुरू (कर्नाटक) – कर्नाटकातील काँग्रेसचे नेते आणि माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी त्यांना ठार मारण्याची धमकी देण्यात आल्याचा दावा केला आहे. एका कार्यक्रमात बोलतांना ते म्हणाले की, या लोकांनी (हिंदुत्वनिष्ठांनी) म. गांधी यांचा अंत केला. ते काय मला सोडणार आहेत ? गांधी यांना गोडसे याने गोळी मारली होती. तरीही ते (हिंदुत्वनिष्ठ) गोडसे याची पूजा करतात.
‘These people killed Gandhi, Will they leave…’, #Siddaramaiah reacts amid death threats https://t.co/caLvZAHUEN
— Zee News English (@ZeeNewsEnglish) August 20, 2022
सिद्धरामय्या पुढे म्हणाले की, मी सावरकर यांच्या फलकांना विरोध करत होतो. सावरकर यांनी इंग्रजांची क्षमा मागितली होती. (काँग्रेसची गोबेल्स नीती ! – संपादक) त्यांना ते (हिंदुत्वनिष्ठ) ‘वीर सावरकर’ म्हणतात. सावरकरांशी माझे वैयक्तिक शत्रूत्व नाही; मात्र यांचे आचरण चांगले नव्हते. शिवमोग्गा येथील मुसलमानबहुल भागात भाजपने सावरकर यांचे छायाचित्र लावण्याचा प्रयत्न केला. मुसलमानांनीही छायाचित्र लावू दिले. पण ते (भाजपवाले) मुसलमान भागात जाऊन असे का करतात ? टिपू सुलतान याच्या चित्राला विरोध का करतात ? (टिपू सुलतान याने लाखो हिंदूंचे धर्मांतर केले, त्यांना ठार मारले, तसेच असंख्य हिंदु स्त्रियांवर अत्याचार केले. यामुळेच त्याला विरोध केला जातो ! टिपू काँग्रेसचा वंशज असल्याप्रमाणे काँग्रेसला त्याचा पुळका येत असतो, हे लक्षात येते ! – संपादक)
हिंदुत्वनिष्ठ आणि भाजप यांच्याकडून विरोध
सिद्धरामय्या यांच्या वरील विधानांनंतर हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि भाजपचे कार्यकर्ते यांच्याकडून त्यांच्या विरोधात आंदोलन करण्यात आले. कोडगु येथे त्यांच्या चारचाकी गाडीवर अंडी फेकण्यात आली, तसेच त्यांना काळे झेंडे दाखवण्यात आले.
संपादकीय भूमिका
|