२६ नोव्हेंबर २००८ प्रमाणे मुंबईत पुन्हा आक्रमण करू !
मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर पाकिस्तानातून धमकीचा संदेश !
मुंबई – मुंबई पोलिसांच्या वाहतूक नियंत्रण विभागाच्या व्हॉट्सअॅप क्रमांकावर २० ऑगस्ट या दिवशी सकाळी पाकिस्तान येथील क्रमांकावरून आलेल्या संदेशात ‘२६ नोव्हेंबर २००८ या दिवसाप्रमाणे मुंबईत पुन्हा आक्रमण करू’, अशी धमकी देण्यात आली आहे. हे आक्रमण ६ जण करणार असल्याचेही त्यात म्हटले आहे. या प्रकरणी अन्वेषण चालू आहे.
Mumbai Police receives threat message warning of a ’26/11′ like terror attack in the city, sounds alert and launches probe https://t.co/2k6afrGeuE
— OpIndia.com (@OpIndia_com) August 20, 2022
राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार म्हणाले, ‘‘अशा प्रकारच्या धमक्या अनेकदा येत असतात. मुकेश अंबानी यांच्या कुटुंबालाही धमकी आली होती. चौकशीअंती ती काही माथेफिरूंनी दिली असल्याचे समजले. मुंबईवर आक्रमण करण्याची धमकी गांभीर्याने घेतली गेली पाहिजे. आपली पोलीस यंत्रणा सक्षम आहे. केंद्रीय यंत्रणांनीही त्यात लक्ष द्यावे.’’ दोनच दिवसांपूर्वी रायगडमधील श्रीवर्धनच्या समुद्रकिनार्यावर शस्त्रास्त्रांनी भरलेली बोट सापडल्याच्या पार्श्वभूमीवर अन्वेषण यंत्रणांनी या संदेशाची गंभीर नोंद घेतली आहे.
संपादकीय भूमिकावारंवार आक्रमणांच्या धमक्या ऐकत रहाण्यापेक्षा पाकिस्तानातील आतंकवादच समूळ नष्ट करायला हवा ! |