श्रीविष्णुसहस्रनाम सर्वसामान्यांपर्यंत कसे पोचले ? याविषयीची सुरस माहिती
पूर्वी एकदा वर्ष १९४० किंवा ५० च्या दशकात कुणीतरी महापेरियार कांची धर्माचार्य चंद्रशेखर सरस्वती यांची मुलाखत घेत होते. ते सद्गृहस्थ मुलाखत ध्वनीमुद्रित करत असतांना ‘टेपरेकॉर्डर’चा (ध्वनीमुद्रकाचा) वापर करत होते. तेव्हा पेरियार यांनी प्रश्नार्थक पवित्रा घेत विचारले, ‘‘कुणाला सर्वांत जुन्या टेपरेकॉर्डरविषयी माहिती आहे का ?’’ यानंतर त्यांनी दुसरा प्रश्न विचारला, ‘‘श्रीविष्णुसहस्रनाम आपल्यापर्यंत कसे आले ?’’ उपस्थित प्रेक्षकांमधील कुणीतरी म्हणाले, ‘‘पितामह भीष्म यांच्यामुळे ते आपल्याला प्राप्त होऊ शकले.’’ यावर सर्वांचे एकमत झाले.
महाभारताच्या युद्धभूमीवर पितामह भीष्म यांनी श्रीविष्णुसहस्रनाम म्हणणे; पण ते कुणीच टिपून न घेतल्याची खंत युधिष्ठिराने व्यक्त करणे
त्यावर महापेरियार यांनी पुढचा प्रश्न केला, ‘‘युद्धभूमीवर सगळ्यांनी भीष्म यांना विष्णुसहस्रनाम म्हणतांना ऐकले, तेव्हा ते कुणी टिपून घेतले ?’’ पुन्हा एकदा शांतता पसरली. तेव्हा महापेरियार यांनी स्पष्ट केले, ‘‘जेव्हा भीष्म कृष्णस्तुतीपर श्रीविष्णुसहस्रनाम म्हणत होते, तेव्हा भगवान श्रीकृष्ण महर्षि व्यास यांच्यासमवेत सर्वजण त्यांच्याकडे पहात होते. जेव्हा त्यांनी १ सहस्र विष्णुनामे म्हणून पूर्ण केली, तेव्हा सर्वजण त्यांच्याकडे आश्चर्यचकित होऊन पहातच राहिले. सर्वांत पहिले युधिष्ठिर भानावर येऊन यावर संमिश्र अभिप्राय देत म्हणाले, ‘‘पितामह यांनी वासुदेवाची उत्कृष्ट अशी रमणीय १ सहस्र नावे पठण केली, आपण सर्वजण फक्त ऐकतच राहिलो; पण कुणी ती टिपून घेतली नाहीत, आता त्याचा क्रमही आपण गमावला.’’ तेव्हा सगळे जण श्रीकृष्णाकडे मोठ्या आशेने वळून साहाय्याची याचना करू लागले. त्यावर भगवान श्रीकृष्ण म्हणाला, ‘‘मलासुद्धा तुम्हा सर्वांप्रमाणे ऐकलेली रचना आवडली; पण आपण काय करू शकतो ?’’
सहदेवाने शिवाची उपासना करून सूतस्फटिकाद्वारे ध्वनीलहरींमध्ये रुपांतरित करून विष्णुसहस्रनाम मिळवणे आणि महर्षि व्यासांनी ते टिपून घेणे
वासुदेव उद्गारले, ‘‘हे फक्त सहदेव पुनर्प्राप्त करू शकेल आणि व्यास ते टिपून घेतील.’’ सर्वजण ‘सहदेव हे कार्य कशा प्रकारे करू शकेल ?’, ते जाणून घेण्यासाठी उत्सुक झाले. तेव्हा श्रीकृष्णाने उत्तर दिले, ‘‘आपल्या सर्वांमध्ये सहदेवाने एकट्याने सूतस्फटिक धारण केले आहे. जर त्याने शिवाची प्रार्थना केली आणि ध्यान केले, तर तो स्फटिकाला ध्वनीलहरींमध्ये रुपांतरित करू शकेल आणि व्यास ते टिपून घेऊ शकतील.’’ तेव्हा सहदेव आणि व्यास जिथे त्यांनी भीष्म पितामह यांना विष्णुसहस्रनाम म्हणतांना ऐकले होते, त्याच ठिकाणी खाली बसले. सहदेवाने स्फटिकाद्वारे ध्वनीलहरींद्वारे विष्णुसहस्रनाम प्राप्त करण्यासाठी शिवाचे ध्यान आणि प्रार्थना करण्यास प्रारंभ केला. स्फटिकाची प्राकृतिक रचना शांत वातावरणामध्ये ध्वनी हस्तगत करू शकेल, अशी असते. शिवाचे उचित असे ध्यान केल्यास या ध्वनीलहरी पुनर्प्राप्त होऊ शकतात.
संगणकाच्या ‘हार्ड डिस्क’मध्ये आणि भ्रमणभाषमधील ‘मेमरी कार्ड’मध्ये स्फटिकाचा वापर केला जाणे
अशा प्रकारे विश्वातील सर्वांत पहिल्या स्फटिक टेपरेकॉर्डरद्वारे रचना ऐकून व्यासांनी ती टिपून घेतली आणि विस्मयकारकरित्या आपल्यापर्यंत विष्णुसहस्रनाम पोचवले. महापेरियार यांनी हे स्पष्ट केले, तेव्हा सर्वजण स्तंभित होऊन ऐकतच राहिले. आपण आज संगणकामध्ये ‘हार्ड डिस्क’ आणि भ्रमणभाषमध्ये ‘मेमरी कार्ड’ वापरतो, त्यामध्ये स्फटिकाचाच वापर होत आहे. याचेशी तंतोतंत जुळणारी माहिती आहे. Quartz stone or SiO2 or silicon म्हणजेच स्फटिक !
(साभार : सामाजिक माध्यम)