भक्तीसत्संग चालू असतांना आस्थापनात असूनही श्री. विजय पाटील यांना शक्ती आणि चैतन्य मिळणे
१. भक्तीसत्संग ऐकता येणार नसल्याची खंत वाटणे
‘१०.२.२०२२ या दिवशी सकाळी जाग आल्यावर ‘आज दुपारी भक्तीसत्संग असेल’, हे माझ्या लक्षात आले; परंतु आस्थापनात जावे लागणार असल्याने ‘भक्तीसत्संग ऐकता येणार नाही’, याची मला खंत वाटली. मी सकाळी आस्थापनात गेल्यावर कामात व्यस्त असल्यामुळे मला भक्तीसत्संगाचा पूर्णपणे विसर पडला.
२. आस्थापनात काम करतांना भक्तीसत्संगाचे चैतन्य अनुभवता येणे
मला दुपारी ४.३० ते ५ या वेळेत आस्थापनात काम करत असतांना अकस्मात् चांगली स्पंदने जाणवायला लागली. तेव्हा मला शक्ती आणि चैतन्य मिळाले. ही स्थिती मी १ ते २ मिनिटे अनुभवली. माझ्या मनात ‘असे का होत आहे ?’, असा विचार आला. तेव्हा ‘भक्तीसत्संगाचे चैतन्य मिळत असावे’, असे मला वाटले.
मी आस्थापनात काम करत होतो, तरी देवाने मला भक्तीसत्संगाचे चैतन्य अनुभवायला दिले. त्याबद्दल मी गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. विजय पाटील, वापी, गुजरात. (१३.२.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |