निकृष्ट रस्त्यांचा अहवाल प्राप्त होऊनही कारवाई नाही !
पुणे – रस्त्यांना खड्डे पडल्याचा अहवाल प्राप्त होऊन २० दिवस उलटून गेले तरी ठेकेदारांवर अद्याप कारवाई झाली नाही. (सामान्य जनतेला महापालिकेतील अधिकार्यांचे ठेकेदारांसमवेत साटेलोटे आहे, असे वाटल्यास चूक ते काय ? – संपादक) महापालिका आयुक्तांनी मुख्य पथक खात्याकडील १३९ दोषदायित्व कालावधीतील (‘डिफेक्ट लायबिलिटी पिरियड’मधील) रस्त्यांची पहाणी करून त्यांची सद्यःस्थिती कशी आहे ? याचा अहवाल सादर करण्यासाठी ‘इंजिनिअर्स इंडिया लिमिटेड’ या त्रयस्थ संस्थेला नियुक्त केले होते. त्या अन्वये त्यांनी रस्त्यांची पहाणी करून १३९ पैकी केवळ १७ रस्तेच खराब झाल्याचा अहवाल २९ जुलै २०२२ या दिवशी सादर केला. यापैकी ८ रस्त्यांना इतर विभागांनी केलेल्या खोदकामामुळे रस्ते पडले आहेत, तर ९ रस्ते हे (डिफेक्ट लायबिलिटी पिरियड) दोषदायित्व कालावधीतील असल्याचे अहवालात नमूद केले आहे.
संपादकीय भूमिकानिकृष्ट रस्त्यांचे अहवाल प्राप्त होऊनही कारवाई न होणे, हे प्रशासनाने असंवेदनशीलतेची परिसीमा गाठल्याचे उदाहरण ! |