रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया बनवून देत आहे आधार कार्ड !
आधार कार्ड बनवून संघटनेत केले जात आहे भरती !
पाटलीपुत्र (बिहार) – जिहादी संघटना पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियाने तिच्या संघटनेत रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान यांना भारती करण्यासाठी त्यांचे आधार कार्ड बनवले होते, अशी माहिती पोलिसांच्या चौकशीत समोर आली आहे. आधार कार्ड बनवण्यासाठी तस्करांकडून बनावट कागदपत्रे बनवण्यात आली होती, तसेच या मुसलमानांना कर्नाटक आणि अन्य राज्यांमध्ये कामगार म्हणून पाठवण्यात येते आहे. त्याद्वारे त्यांची नवीन ओळख निर्माण केली जात आहे. बिहारच्या नेपाळ सीमेवरील किशनगंज, दरभंगा, कटिहार, मधुबनी, सुपौल आणि पूर्णिया या जिल्ह्यांमध्ये हा प्रकार चालू आहे.
आधार कार्ड बनवण्यासाठी भारतीय मुसलमानांचा वापर !
एका पोलीस अधिकार्याने सांगितले की, आधार कार्ड बनवण्यासाठी पी.एफ्.आय.कडून भारतीय मुसलमान कुटुंबांचा वापर केला जात आहे. यासाठी या कुटुंबांना पी.एफ्.आय.कडून विविध आमीषे दाखवण्यासह पैसेही देण्यात येत आहेत. त्यानंतर ही कुटुंबे रोहिंग्या आणि बांगलादेशी घुसखोर मुसलमान हे त्यांच्या कुटुंबातील सदस्य असल्याचे सांगत आहेत. ज्या व्यक्तीचे आधार कार्ड बनवण्यात येणार आहे, त्याविषयी भारतीय मुसलमान सांगत आहेत की, ही व्यक्ती जेव्हा लहान होती, तेव्हा नातेवाइकांकडे तिला पाठवण्यात आले होते. त्यामुळे तिचे आधार कार्ड बनवू शकलो नाही. आता आमच्याकडे ती परत आल्याने आम्ही कार्ड बनत आहोत.
बंगाल आणि आसाम मार्गे नाही, तर नेपाळ मार्गे घुसखोरी !
या अधिकार्याने पुढे सांगितले की, बंगाल आणि आसाम येथील सीमेवर आता कडक सुरक्षा असल्याने हे घुसखोर नेपाळ मार्गे भारतात घुसखारी करत आहेत. भारत-नेपाळ सीमेवर अनेक ठिकाणी ते मोठ्या संख्येने रहात आहेत.
नेपाळ सीमेवर ५०० कोटी रुपये खर्च करून ७०० नवीन मदरसे आणि मशिदींचे बांधकाम !
वर्ष २०१८ नंतर नेपाळ सीमेवर ५०० कोटी रुपये खर्च करून ५०० नवीन मदरसे आणि मशिदी बांधण्यात आल्या आहेत. यासाठी संयुक्त अरब अमिरात, कतार आणि तुर्की या देशांतून अर्थपुरवठा करण्यात आला आहे, असेही या पोलीस अधिकार्याने सांगितले.
संपादकीय भूमिकाराष्ट्रघातकी पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडियावर केंद्र सरकार बंदी कधी घालणार ?, असा प्रश्न हिंदूंकडून सातत्याने विचारला जात आहे, याकडे सरकारने लक्ष द्यायला हवे ! |