देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून लोकसभेची उमेदवारी देण्याची मागणी !
पुणे – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी द्या, अशी मागणी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांना ‘अखिल भारतीय ब्राह्मण महासंघा’ने पत्राद्वारे केली आहे. भाजप नक्कीच देवेंद्र फडणवीसांच्या नावाची घोषणा करून त्यांचा सन्मान करतील, अशी आशा अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाचे अध्यक्ष गोविंद कुलकर्णी यांनी व्यक्त केली आहे.