बांगलादेशातील हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये !
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचे आवाहन
ढाका (बांगलादेश) – श्रीकृष्णजन्माष्टमीच्या निमित्ताने बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी हिंदूंना उद्देशून म्हटले की, हिंदूंनी स्वतःला अल्पसंख्यांक समजू नये. मला जितके अधिकार आहेत, तितकेच बांगलादेशी हिंदूंनाही आहेत. मुसलमानबहुल देशात सर्व धर्मियांना समान अधिकार आहेत. बंगाल राज्यांत दुर्गापूजेचे जेवढे मंडप असतात, त्यापेक्षा अधिक मंडप ढाक्यामध्ये असतात, असा दावाही त्यांनी या वेळी केला.
#Bangladesh PM Sheikh Hasina interacted with the Hindu community leaders on the occasion of #Janmashtami & urged believers of other faiths not to think of themselves as minorities.https://t.co/aoeZ9jzvql
— News9 (@News9Tweets) August 19, 2022
संपादकीय भूमिकाशेख हसीन यांनी केवळ असे केवळ आवाहन करू नये, तर या हिंदूंचे धर्मांधांपासून रक्षण करावे, तसेच त्यांच्या मंदिरांचे आणि हिंदु महिलांचे रक्षण करावे ! |