सलमान रश्दी यांच्यावर आक्रमण करणार्याला न्यायालयाने एका आठवड्यात ठरवले दोषी
मेविले (अमेरिका) – प्रसिद्ध लेखक सलमान रश्दी यांच्यावर १२ ऑगस्ट २०२२ या दिवशी न्यूयॉर्क येथे प्राणघातक आक्रमण करणारा २४ वर्षीय हादी मतार याला येथील १९ ऑगस्ट २०२२ या दिवशी, म्हणजे एका आठवड्यात न्यायालयाने दोषी ठरवले आहे. न्यायालयाने ‘हे एक सुनियोजित आक्रमण आहे’, असे म्हटले. न्यूयॉर्क येथे एका कार्यक्रमात रश्दी यांच्यावर चाकूद्वारे आक्रमण करण्यात आले होते. या वेळी हादी मतार याला जागेवरच पकडण्यात आले होते.
The man accused of stabbing Salman Rushdie on stage last week has pleaded not guilty to attempted murder and assault charges https://t.co/EBNBCIB3vJ
— Sky News (@SkyNews) August 18, 2022