ठाणे येथील सौ. भक्ती गैलाड यांना वर्ष २०२२ चा गुरुपौर्णिमा सोहळा ‘ऑनलाईन’ पहातांना जाणवलेली सूत्रे आणि आलेल्या अनुभूती
सर्व साधकांचा आधार असलेले सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले !
‘१३.७.२०२२ या दिवशी मी ‘ऑनलाईन’ गुरुपौर्णिमा महोत्सव पाहिला. त्या वेळी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या ८० व्या वाढदिवसानिमित्त (२२.५.२०२२ या दिवशी) आयोजित केलेल्या रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती दाखवण्यात आली. ती ध्वनीचित्र-चकती आणि गुरुपौर्णिमा सोहळा पहातांना सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या कृपेमुळे मला जाणवलेली सूत्रे अन् आलेल्या अनुभूती पुढे दिल्या आहेत.
१. रथोत्सवाची ध्वनीचित्र-चकती पहातांना आलेल्या अनुभूती
अ. रथामध्ये बसलेल्या सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना पाहून ‘करुणामयी ईश्वराला पृथ्वीवरील जिवांप्रती अपार करुणा वाटली असावी; म्हणून त्याने गुरुरूपामध्ये अवतार धारण केला आहे’, असे मला वाटले.
आ. ‘चराचर सृष्टीतील जिवांना ईश्वराचे दर्शन व्हावे’, यासाठीच हा रथोत्सव आयोजित करण्यात आला होता’, असे मला वाटले. त्या वेळी परिसरातील मार्ग आणि सर्व झाडे प्रफुल्लित दिसत होती. ‘तेही किती भाग्यवान आहेत !’, असे मला जाणवले.
इ. सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना नमस्कार करणार्या साधकांना पाहून ‘त्या प्रत्येक साधकाच्या ठिकाणी मीच आहे’, असे मला वाटत होते.
ई. नृत्य करणार्या साधिका नृत्यांमध्ये ‘फुलांचे हार बनवणे, अर्पण करणे आणि नमस्कार करणे’, अशा विविध मुद्रा करत असतांना ‘हे सर्व मीही सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्यासाठी करत आहे’, असे मला जाणवत होते.
२. गुरुपौर्णिमा सोहळा पहात असतांना माझ्या डोळ्यांतून सतत भावाश्रू येत होते. माझ्या मनात सतत कृतज्ञताभाव जागृत होत होता.’
– सौ. भक्ती गैलाड, ठाणे, महाराष्ट्र. (१७.७.२०२२)
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |