आरोग्य विभागातील १० सहस्र ८२७ जागा रिक्तच !
कोरोनाच्या महामारीनंतरही राज्यातील आरोग्ययंत्रणेची दूरवस्था !
मुंबई, १८ ऑगस्ट (वार्ता.) – आरोग्य विभागातील जागा मोठ्या प्रमाणात रिक्त असल्याचा फटका कोरोनाच्या महामारीत बसला; मात्र अजूनही महाराष्ट्रातील आरोग्य विभागातील १० सहस्र ८२७ जागा भरण्यात आलेल्या नाहीत. १८ ऑगस्ट या दिवशी विधानसभेत एका तारांकित प्रश्नाला उत्तर देतांना राज्याचे नवनियुक्त आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी ही माहिती सभागृहात दिली. कोरोनाच्या काळात राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असतांना तत्कालीन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आरोग्य विभागातील रिक्त जागा भरण्याचे आश्वासन दिले होते. वर्ष २०१९ पासून आरोग्य विभागातील विविध पदांची भरतीप्रक्रिया चालू आहे. वर्ष २०२१ मध्ये विधीमंडळाच्या अधिवेशनातही उपस्थित झाला होता; मात्र अजूनही आरोग्य विभागातील रिक्त जागांच्या भरतीची प्रक्रिया पूर्ण झालेली नाही.
संपादकीय भूमिकासहस्रावधींच्या संख्येत पदे रिक्त असणारा आरोग्य विभाग जनतेच्या आरोग्याची काळजी कशी घेणार ? |