मंगळुरू (कर्नाटक) येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याला स्पर्धा परीक्षेत मिळाले सुयश !
मंगळुरू (कर्नाटक) – येथील सनातन संस्थेचा युवा साधक कु. पार्थ पै याने कर्नाटकातील विज्ञानशाखेच्या सी.ई.टी. (सामायिक प्रवेश परीक्षा) या स्पर्धा परीक्षेत राज्यात ४६ वा क्रमांक (इंजिनीयरींग विभाग) मिळवला आहे. याचसमवेत कु. पार्थ याने राष्ट्रीय स्तरावरील ‘जेईई (मेन्स)’ (संयुक्त प्रवेश परीक्षा) या परीक्षेत ९९.६६ टक्के गुण मिळवले आहेत. कु. पार्थ हा येथील सनातनचे साधक सौ. अंजनी पै आणि श्री. पुंडलिक पै यांचा सुपुत्र आहे. कु. पार्थ याने ‘अभ्यासासह गुरुसेवाही नियमितपणे केल्याने मला शिक्षणात यश प्राप्त झाले आहे’, असे सांगून श्री गुरुचरणी कृतज्ञता व्यक्त केली.