कु. गौरी मुद्गल हिने काढलेली बालकभावातील आध्यात्मिक चित्रे आणि त्यांचा भावार्थ !
कु. गौरी मुद्गल या रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून सेवा करत आहेत. वर्ष २०१५ मध्ये त्या कोल्हापूर येथे असतांना त्यांनी काढलेली बालकभावातील आध्यात्मिक चित्रे आणि त्यांचा भावार्थ पुढे दिला आहे.
चित्राचे स्पष्टीकरण
‘या चित्रात श्रीकृष्णाचे छायाचित्र दाखवले असून त्याच्या भोवती श्रीकृष्णाच्या लाडक्या लहान लहान ४ गोपी दाखवल्या आहेत. परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे चरण दाखवले आहेत. गुरुदेव हे कृष्णस्वरूपच आहेत आणि गोपी त्यांची भक्ती करत आहेत.
१. अमृता – ही गुरुदेवांच्या चरणी पुष्पे अर्पण करत आहे.
२. गौरी – हिने श्रीकृष्णाला अर्पण करण्यासाठी हातात पुष्पहार धरला आहे.
३. मानसी – ही श्रीकृष्णाला क्षमायाचना करत आहे.
४. रुचिका – ही प्रार्थना करून आत्मनिवेदन करत आहे.’
– कु. गौरी मुद्गल (आताचे वय २२ वर्षे), कोल्हापूर (१६.४.२०१५)
चित्राचे स्पष्टीकरण
‘या चित्रात प.पू. भक्तराज महाराज दिसत असून त्यांच्या खाली भगवान श्रीकृष्ण आहेत. सर्वांत खाली श्रीगुरुचरण दाखवले असून त्यांच्या चरणी पुष्पे वाहिलेली दाखवली आहेत.’
चित्राचे स्पष्टीकरण
‘या चित्रात मुरलीधर श्रीकृष्ण दाखवला आहे आणि त्याच्या एका बाजूला सुदर्शनचक्र, तर एका बाजूला बासरी दाखवली आहे. चित्राच्या खाली ‘भगवान श्रीकृष्ण आणि परम पूज्यांची लाडकी गौरी’, असे लिहिले आहे.’
कु. गौरी मुद्गल हिने काढलेल्या अन्य चित्राचे स्पष्टीकरणएका चित्रात बालकभावातील चित्राद्वारे साधिकांचे श्रीकृष्णाशी असलेले अनुसंधान दाखवले आहे. यात भक्तीचे विविध प्रकार दाखवले आहेत. १. मधुराभक्ती : यात ‘साधिकेच्या समवेत श्रीकृष्ण आहे’, असे दाखवले आहे. २. अर्चनभक्ती : या साधिकेने हातात श्रीकृष्णासाठी पुष्पहार घेतला आहे. ३. आत्मनिवेदन : यात साधिका श्रीकृष्णाला आत्मनिवेदन करतांना स्वतःचे कान धरून क्षमायाचना करत आहे. ४. समर्पणभक्ती : यात साधिका श्रीकृष्णाला समर्पण होऊन हात जोडून प्रार्थना करत आहे.’ – कु. गौरी मुद्गल (आताचे वय २२ वर्षे), कोल्हापूर (१६.४.२०१५) |
या लेखात प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या भाव तेथे देव या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |