(म्हणे) ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सनातन संस्थेनेच केली आहे !’
भोंदू विज्ञानवादी शाम मानव यांचे पुन्हा सनातनद्वेषी विधान !
सातारा – डॉ. नरेंद्र दाभोलकर यांची हत्या सनातन संस्थेनेच केली आहे, हे मीच प्रथम बोललो होतो. याविषयी मी अनेकदा लिहून दिले होते. ‘संस्थेची माणसे कोणकोणत्या गोष्टींचा वापर करून हत्या करणार’, तेही मी सांगितले होते. (‘हत्या करण्यासाठी सनातनने संमोहनाचा वापर केला’, अशा आशयाची फुकाची टीका शाम मानव नेहमीच करतात. त्याचे खंडण संमोहनतज्ञ मनोहर नाईक यांनी करून मानव यांचा खोटेपणा उघड केला होता; मात्र तरीही ‘खोटे बोल; पण रेटून बोल’ या उक्तीनुसार मानव यांचा कांगावा चालूच आहे. अशांची निंदा करावी तेवढी थोडीच ! – संपादक) मी केवळ लिहून थांबलो, असे नाही, तर ते लिखाण मी तत्कालीन राज्य आणि केंद्र सरकार यांच्याकडेही दिले होते, असे वक्तव्य अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक श्याम मानव यांनी केले. येथील ‘राष्ट्रीय विज्ञान परिषदे’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या कार्यक्रमानंतर ते ‘तरुण भारत’च्या प्रतिनिधीशी बोलत होते.
मानव पुढे म्हणाले,
१. महाराष्ट्र पोलिसांनी चांगले अन्वेषण केले; पण सीबीआयकडे अन्वेषण गेल्यावर काय झाले, ते मला माहिती नाही. डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, गौरी लंकेश, डॉ. कलबुर्गी या चारही हत्या सनातन संस्थेने केल्या आहेत. (अन्वेषण यंत्रणांपेक्षा स्वतःला शहाणे समजणारे मानव ! – संपादक)
२. महाराष्ट्र पोलिसांनी प्रामाणिकपणे काम केले; पण त्यांना पुरावेच सिद्ध करता येत नाहीत. (गुन्हा केलेलाच नसेल, तर पुरावे मिळणार कसे ? पोलिसांच्या कर्तव्याविषयी अशा प्रकारे नकारात्मक टिपणी करणारे शाम मानव यांच्यावर पोलिसांनीच कारवाई करावी ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|