जबलपूर (मध्यप्रदेश) येथील प्रादेशिक परिवाहन अधिकार्याकडे घातलेल्या धाडीमध्ये सापडली उत्पन्नापेक्षा ६५० पट अधिक संपत्ती !
जबलपूर (मध्यप्रदेश) – येथील प्रादेशिक परिवाहन अधिकारी संतोष पाल सिंह यांच्या घरी आर्थिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी धाड टाकल्यावर उत्पन्नापेक्षा ६५० पट अधिक किमतीची मालमत्ता आढळली. या वेळी घरातून १६ लाख रुपयांच्या रोख रकमेसह काळ्या पैशांतून मिळवलेल्या मालमत्तेची कागदपत्रे सापडली आहेत. सिंह यांच्या नावावर ६ घरे आणि शेतघरे, प्रशस्त गाड्या, तसेच लाखो रुपयांचे दागिने असल्याची माहिती पथकाला मिळाली.
The #EconomicOffenceWing found properties worth crores, luxury cars, a theater at home in a raid at a regional transport officer’s house in #MadhyaPradesh’s Jabalpur.
(Dheeraj Shah)https://t.co/1vPYOSIRgm— IndiaToday (@IndiaToday) August 18, 2022
आर्थिक गुन्हे शाखेचे पोलीस अधीक्षक देवेंद्र प्रताप सिंह यांच्या म्हणण्यानुसार, संतोष पाल आणि त्यांची लिपिक पत्नी रेखा पाल यांच्याकडे प्रचंड संपत्ती असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. त्याआधारे येथे धाड घालण्यात आली.
संपादकीय भूमिकाएका अधिकार्याकडे इतकी संपत्ती सापडते, तर अन्य अधिकार्यांकडे किती संपत्ती असेल आणि देशातील सर्वच सरकारी अधिकार्यांची पडताळणी केली, तर किती बेहिशोबी संपत्ती मिळेल, याची कल्पनाच करता येत नाही ! |