माजी केंद्रीय मंत्री शाहनवाज हुसेन यांच्यावर बलात्काराचा गुन्हे नोंदवा !

  • देहली उच्च न्यायालयाचा पोलिसांना आदेश  

  • गुन्हा नोंदवण्याच्या मागणीसाठी महिलेचा न्यायालयात अर्ज

माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते शाहनवाज हुसेन

नवी देहली – माजी केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते शाहनवाज हुसेन यांच्या विरोधात बलात्कार आणि अन्य आरोप यांप्रकरणी गुन्हा नोंदवण्याचा आदेश देहली उच्च न्यायालयाने पोलिसांना दिला. यासह या प्रकरणांचे अन्वेषण पुढील ३ मासांत पूर्ण करण्यासही न्यायालयाने सांगितले. देहलीत रहाणार्‍या एका महिलेने जानेवारी २०१८ मध्ये सत्र न्यायालयात याचिका प्रविष्ट करून शाहनवाज हुसेन यांच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्याची मागणी केली होती. महिलेच्या आरोपानुसार, शाहनवाज हुसेन यांनी छतरपूर येथील शेतघरात नेऊन तिच्यावर बलात्कार करून तिला ठार मारण्याची धमकी दिली होती.

देहली न्यायालयाने म्हटले की, या प्रकरणाची सर्व वस्तूस्थिती पहाता हे स्पष्ट होते की, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यास पोलीस फारसे उत्सुक नाहीत, तसेच पोलिसांनी कनिष्ठ न्यायालयात सादर केलेला अहवाल हा अंतिम अहवाल नाही. (हे पोलिसांना लज्जास्पद ! – संपादक)

संपादकीय भूमिका

मंत्र्यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यासाठी जनतेला न्यायालयाचे दार ठोठवावे लागू नये !