अंजुमन इंतजामिया मशीद कमिटीला ५०० रुपयांचा दंड
ज्ञानवापी आणि शृंगार गौरी दर्शन यांचे प्रकरण
वाराणसी (उत्तरप्रदेश) – येथील ज्ञानवापी आणि शृंगार गौरी दर्शन यांच्या प्रकरणी जिल्हा न्यायालयाने मुसलमानांची पक्षकार असणार्या ‘अंजुमन इंतजामिया मशीद कमिटी’ला ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. प्रकरणाला विलंब केल्यावरून हा दंड ठोठावण्यात आला. या खटल्याची पुढील सुनावणी २२ ऑगस्टला होणार आहे.