महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी ‘उमेद’च्या व्यवस्थापकांना अटक
देवगड – महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवोन्नती अभियानाचे (उमेदचे) येथील व्यवस्थापक शिवाजी पांडुरंग खरात यांना महिलेचा विनयभंग केल्याच्या प्रकरणी पोलिसांनी अटक केली आहे.
या प्रकरणी महिलेने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, खरात यांनी वर्ष २०१८ पासून माझा मानसिक आणि शारीरिक छळ केला. ११ ऑगस्ट २०२२ या दिवशी येथे बैठक चालू असतांनाही खरात यांनी विनयभंग केला अन् शिवीगाळ करून मारण्याची धमकी दिली.
संपादकीय भूमिकापुरो(अधो)गामित्वामुळे धर्मशिक्षण न मिळाल्याचे समाजाची होत असलेली अधोगती ! |