पाकमध्ये स्वातंत्र्यदिनी विदेशी महिला पर्यटकांशी पाकिस्तानी तरुणांकडून अयोग्य वर्तन !
इस्लामाबाद (पाकिस्तान) – पाकिस्तानच्या १४ ऑगस्टला झालेल्या स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी दोघा विदेशी महिला पर्यटकांशी पाकिस्तानी तरुणांनी अयोग्य वर्तन केले. या प्रकरणी पोलिसांनी या तरुणांना अटक केली आहे. या संदर्भातील एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित होत आहे. यात पाकिस्तानी तरुणांच्या घोळक्यामध्ये एक विदेशी महिला आणि तिची तरुण मुलगी अडकली अन् आणि त्या दोघीही भेदरलेल्या असल्याचे दिसत आहेत. कसेही करून या घोळक्यातून त्या बाहेर पडू इच्छित असल्याचे त्यांच्या डोळ्यांतून दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतरच इस्लामाबाद पोलिसांनी अयोग्य वर्तन करणार्या तरुणांना पकडले.
संपादकीय भूमिकापाकमध्ये याहून वेगळे काय घडणार ? |