‘राष्ट्रपती पदका’साठी पुणे पोलीस दलाकडून कुणाचाही अर्ज नाही !
पुणे – प्रतिवर्षी स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला पोलीस दलातील अधिकारी, कर्मचारी यांनी बजावलेल्या सेवेसाठी ‘राष्ट्रपती पदक’ घोषित केले जातात; परंतु या वर्षी ‘राष्ट्रपती पदका’साठी पुणे पोलीस दलातून एकही अधिकारी किंवा कर्मचार्याने अर्ज सादर केला नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे ‘राष्ट्रपती पदका’करता निवड न होण्याची ही पहिलीच वेळ ठरली आहे. या ‘राष्ट्रपती पदका’करता पोलीस दलासह कारागृह, अग्नीशमनदल, राज्य राखीव पोलीस दल (एस्.आर्.पी.एफ्.), केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (सी.आर्.पी.एफ्.) येथील कर्मचार्यांची या पदकाकरता निवड केली जाते.