पुणे शहरात इतरत्र पडलेले ध्वज ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ या मोहिमेतून गोळा केले !
पुणे – ‘मेरा तिरंगा मेरा अभिमान’ या अभियानातून स्वातंत्र्यदिनाच्या दुसर्या दिवशी कर्वे रस्ता, पौड रस्ता, डेक्कन जिमखाना, फर्ग्युसन महाविद्यालय या शहराच्या विविध भागांतून अनेक ठिकाणी रस्त्यावर इतरत्र पडलेले ध्वज संकलित करून ‘कीर्तने अँड पंडित’ या आस्थापनाने तिरंग्याचा अभिमान जपला. या मोहिमेमध्ये आस्थापनाचे श्री. मिलिंद लिमये यांच्या नेतृत्वाखाली १०० विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. लिमये म्हणाले, ‘‘प्रत्येक भारतियाचा अभिमान असलेल्या तिरंगा ध्वजाचा उचित सन्मान व्हावा, या हेतूने हे अभियान राबवले. गोळा केलेले सर्व ध्वज सन्मानपूर्वक ‘भारत फ्लॅग फाऊंडेशन’कडे सुपुर्द केले जाणार आहेत.’’
संपादकीय भूमिकाध्वजाचा अवमान होऊ नये, यासाठी ध्वज संकलन करणार्या आस्थापनाचे अभिनंदन ! नागरिकांनी ध्वज रस्त्यावर इतरत्र फेकणे अयोग्य आहे. यातून नागरिकांमध्ये देशप्रेम निर्माण करणे किती आवश्यक आहे, हे दर्शवणारी घटना ! |