भगवान श्रीकृष्णाच्या सर्वांत मोठ्या चित्रांचे संच करण्याची सेवा करत असतांना ‘प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण सेवा करवून घेत आहे’, असे जाणवणे
भगवान श्रीकृष्णाच्या सर्वांत मोठ्या चित्रांचे संच करण्याची सेवा करत असतांना ‘प्रत्यक्ष भगवान श्रीकृष्ण समोर उभा आहे आणि तोच माझ्याकडून सेवा करवून घेत आहे’, असे जाणवणे अन् त्यानंतर त्या चित्रात ३१ टक्के श्रीकृष्णतत्त्व असल्याचे समजणे
‘१४.५.२०२२ या दिवशी मी भगवान श्रीकृष्णाच्या सर्वांत मोठ्या चित्रांचे संच करण्याची सेवा करत होतो. तेव्हा मी एकेक चित्र नीट पडताळून त्यांचा संच करत होतो. मी सेवा करत असतांना ‘प्रत्यक्षात भगवान श्रीकृष्ण माझ्यासमोर उभा आहे आणि तो माझ्याकडून सेवा करवून घेत आहे’, असे मला जाणवत होते. भगवान श्रीकृष्णाच्या कृपेमुळे सेवा करत असतांना मला चैतन्य मिळून आध्यात्मिक लाभ होत होता. अशा प्रकारे माझ्यावर १ ते दीड घंटा आध्यात्मिक स्तरावरील उपाय झाले. तेवढ्यात सौ. अक्षरा शिंदे समोरून जात असतांना मी त्यांना झालेला प्रसंग सांगितला. श्रीकृष्णाचे चित्र पाहून त्या मला म्हणाल्या, ‘‘या श्रीकृष्णाच्या चित्रामध्ये ३१ टक्के (सर्वाधिक) कृष्णतत्त्व आहे; म्हणून तुम्हाला आध्यात्मिक लाभ झाला.’’ या आधी मला ‘श्रीकृष्णाच्या त्या चित्रामध्ये ३१ टक्के श्रीकृष्णतत्त्व आहे’, हे ठाऊक नव्हते.
परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपेने मला ही दिव्य अनुभूती आली. यासाठी मी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता व्यक्त करतो.’
– श्री. अरुण लक्ष्मण बट्टेवार (वय ६५ वर्षे), सनातन आश्रम, देवद, पनवेल. (१७.५.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |