‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळा’च्या विरोधात सोलापूर येथे हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ !
सोलापूर, १७ ऑगस्ट (वार्ता.) – येथील जिल्हा परिषद, पूनम गेट द्वाराजवळ हिंदु जनजागृती समिती आणि हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने १७ ऑगस्ट या दिवशी सकाळी ११ वाजता ‘हिंदु राष्ट्र-जागृती आंदोलन’ करण्यात आले. या वेळी ‘महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ’ मशिदींच्या भोंग्याद्वारे होणार्या ध्वनीप्रदूषणाकडे दुर्लक्ष करून केवळ हिंदूंच्याच सणांच्या वेळी प्रदूषण होते’, अशी आवई उठवत एकतर्फी कारवाई करत आहे, तसेच हिंदूंच्या सणांना बदनाम करणारे अहवालही प्रसिद्ध करत आहे, असा आरोप करण्यात आला, तसेच देशभरात होत असलेल्या हिंदूंच्या हत्यांची चौकशी ‘राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणे’कडे (एन्.आय.ए.कडे) देऊन दोषींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणीही आंदोलनात करण्यात आली. नंतर निवासी उपजिल्हाधिकारी शमा पवार यांना निवेदन देण्यात आले. कार्यकर्ते आणि हिंदुत्वनिष्ठ यांनी घोषणा दिल्या.