हिंदूंनी फाळणीच्या वेळचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे ! – अधिवक्ता सतीश देशपांडे, इतिहास आणि संस्कृती अभ्यासक
हिंदु जनजागृती समितीच्या वतीने आयोजित विशेष संवाद : ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’
मुंबई – भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदु आणि शीख बांधवांच्या हत्या करण्यात आल्या. हिंदु आणि शीख महिला अन् मुली यांच्यावर भयंकर अत्याचार करण्यात आले की, जे शब्दांत वर्णन करू शकत नाही. स्वत:ला बुद्धीवादी आणि इतिहासतज्ञ समजणारे ‘दोन्ही बाजूने हिंसाचार झाला’, असे आतापर्यंत खोटे सांगत आले आहेत. हा हिंदू मृतकांवरील अन्याय असून इतिहासातील चूकसुद्धा आहे. त्यामुळे हिंदूंनी फाळणीच्या वेळचा सत्य इतिहास समजून घेऊन आत्मपरीक्षण करावे, असे आवाहन इतिहास आणि संस्कृती अभ्यासक, लेखक अन् अधिवक्ता सतीश देशपांडे यांनी केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’च्या निमित्ताने आयोजित केलेल्या ‘भारताच्या विभाजनाचा काळा इतिहास !’ या विषयावरील ‘ऑनलाईन’ विशेष संवादात ते बोलत होते.
अधिवक्ता देशपांडे पुढे म्हणाले की,
१. मुस्लीम लीगच्या ‘डायरेक्ट एक्शन डे’च्या (हिंदूंच्या विरोधात थेट कृती करण्याच्या योजनेच्या) घोषणेने दंगली घडवून, हिंदूंवर अत्याचार करून आणि भूमी बळकावून फाळणी घडवून आणली गेली.
२. पश्चिम बंगाल प्रांत आणि तेव्हाचा पूर्व बंगाल (आताचा बांगलादेश) येथे श्री. गोपाल पाठा यांच्या नेतृत्वाखाली हिंदूंनी केलेल्या प्रतिकारामुळे मुस्लीम लीगने त्या वेळी केलेल्या दंगली रोखल्या गेल्या; मात्र श्री. गोपाल पाठा कोण आहेत ? हे आजच्या पिढीला माहितीच नाहीत; कारण भारताच्या फाळणीच्या वेळी हिंदू बांधवांवर झालेला अत्याचार आणि त्यांनी केलेले बलीदान यांचा सत्य इतिहास आतापर्यंत सांगितलाच गेलेला नाही.
हे पहा –
आजादी के अमृत महोत्सव के उपलक्ष्य में….
हिन्दू जनजागृति समिति आयोजित 🔊 विशेष संवाद
🔴 भारत के विभाजन का काला इतिहास
____________________________
३. आताच्या पाकिस्तानात असलेले लाहोर आणि रावळपिंडी येथे हिंदूंच्या नृशंस हत्या अन् स्त्रियांवर अमानुष अत्याचार करण्यात आले. रेल्वेगाड्यांमधून हिंदूंचे मृतदेह ‘आझादी का तोहफा’ (स्वातंत्र्याची भेट) म्हणून अमृतसर आणि देशातील अन्य ठिकाणी पाठवण्यात आले.
४. स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी ‘देशाचे विभाजन होईल’, याविषयी वर्ष १९४२ मध्ये केलेल्या भाषणातून अगोदरच सावधही केले होते; मात्र ‘सावरकरच देशाच्या फाळणीला उत्तरदायी आहेत’, असा दुष्प्रचार अजूनही केला जातो. ‘महंमद अली जीना यांच्यासह मुसलमान नेत्यांनी फाळणी घडवून आणली’, हे सत्य सुस्पष्टपणे सांगितले जात नाही.
अधिवक्ता सतीश देशपांडे
संपादकीय भूमिकास्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतरही फाळणीच्या वेळचा सत्य इतिहास देशवासियांना न समजणे, हे सर्वपक्षीय शासनकर्त्यांना लज्जास्पद ! |