तुमकुरू (कर्नाटक) येथे अज्ञातांनी फाडला स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फ्लेक्स फलक !
तुमकुरू (कर्नाटक) – शिवमोग्गा येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या फ्लेक्स फलकावरून झालेल्या हिंसाचारानंतर आता राज्यातील तुमकुरू येथेही अशा प्रकारची घटना घडली आहे. येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे छायाचित्र असलेला फलक फाडण्यात आला आहे. येथील अशोका मार्गावर हा फलक लावण्यात आला होता. पोलीस या घटनेची चौकशी करत आहेत. स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त भाजपचे आमदार ज्योती गणेश यांनी शहरातील विविध भागांत स्वातंत्र्यवीरांची ८० छायाचित्रे असलेले फ्लेक्स फलक लावले होते. त्यातील अशोका मार्गावरील फलक फाडण्यात आला.
सौजन्य रिपब्लिक वल्ड