अजित डोवाल यांच्या सुरक्षेत कुचराई करणारे ३ कमांडो बडतर्फ !
नवी देहली – भारताचे राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या सुरक्षेमध्ये कुचराई करणार्या ३ कमांडोजना बडतर्फ करण्यात आले आहे. यावर्षीच्या फेब्रुवारी मासामध्ये एक व्यक्ती चारचाकी वाहन घेऊन डोवाल यांच्या घरापर्यंत पोचली होती. पोलिसांनी त्या व्यक्तीला अटकही केली होती.
NSA अजीत डोभाल की सुरक्षा में लगे 3 कमांडो को नौकरी से बर्खास्त कर दिया गया है
(@aajtakjitendra)https://t.co/nSvgHstQ40
— AajTak (@aajtak) August 17, 2022
गृहमंत्रालयाशी संबंधित सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार या प्रकरणी पोलीस उपमहानिरीक्षक आणि एक कमांडो यांचे स्थानांतर करण्यात आले आहे. डोवाल यांना ‘झेड प्लस’ स्तराचे संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. यांतर्गत एकूण ५८ संरक्षण अधिकारी आणि कर्मचारी यांचा समावेश असतो.