नागपूर येथे मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी वडिलांना अटक !

नागपूर – शहरातील हिंगणा येथे स्वतःच्या १३ वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी पोलिसांनी मुलीच्या वडिलांना १३ ऑगस्ट या दिवशी अटक केली आहे. आरोपी हा पत्नी आणि १० वर्षांचा मुलगा अन् मुलगी यांसह रहातो. तो काहीही कामधंदा करत नसून त्याची पत्नी शेतमजुरी करते. वडिलांना मद्याचे व्यसन आहे. मुलीवर अत्याचार केल्याची वाच्यता केल्यास आईसह जिवे मारण्याची धमकी वडिलांनी मुलीला दिली होती. त्यामुळे मुलगी गप्प बसली. या प्रकरणी मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. ‘वडील मुलीच्या पवित्र नात्याला कलंकित करणारी घटना असून राज्य महिला आयोगाने या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली आहे. हे प्रकरण जलदगती न्यायालयात चालवून आरोपीला कठोर शिक्षा होसाठी पोलिसांना निर्देश देण्यात आले आहेत’, असे राज्य महिला आयोगाच्या सदस्या आभा पांडे यांनी सांगितले.