येमेन देशात जाण्यास बंदी असूनही तेथे २ वेळा जाऊन आलेला निसार अहमद कह्यात
वास्को, १६ ऑगस्ट (वार्ता.) – बंदी असलेल्या येमेन देशात अनधिकृतपणे २ वेळा जाऊन आलेला मूळचा कारवार, कर्नाटक येथील रहिवासी आणि सध्या बेळगाव येथे मॅकॅनिक म्हणून काम करणारा संशयित निसार अहमद याला दाबोळी विमानतळ पोलिसांनी कह्यात घेतले आहे. संशयित निसार अहमद याच्या पारपत्रावरून त्याने बंदी असतांना येमेन देशात २ वेळा प्रवास केल्याचे ‘इमीग्रेशन’ अधिकार्याच्या (विदेशातून येणार्या लोकांची अधिकृत कागदपत्रे तपासण्यासाठी विमानतळावर असलेल्या केंद्रातील अधिकार्याच्या) लक्षात आल्यावर ही कारवाई करण्यात आली. संशयित निसार अहमद याची नंतर जामिनावर सुटका झाली.
#Goa #news #localnews #BreakingNews pic.twitter.com/f9q03KHs1o
— Goemkarponn (@goemkarponnlive) August 16, 2022
निसार अहमद संयुक्त अरब अमिरात येथे जाण्यासाठी दाबोळी विमानतळावर ‘इमीग्रेशन क्लियरन्स’ घेण्यासाठी आला होता. या वेळी ‘इमीग्रेशन’ अधिकार्याच्या लक्षात आले की, संशयित निसार अहमद याने वर्ष २०१९-२०२१ या काळात येमेन देशात जाण्यास बंदी असतांना २ वेळा प्रवास केला आहे. भारताने येमेन देशात जाण्यास ३ ऑक्टोबर २०१७ पासून बंदी घातलेली आहे. यानंतर संशयित निसार अहमद याला दाबोळी विमानतळ पोलिसांच्या स्वाधीन करून त्याच्या विरोधात पारपत्र कायदा १९६७ चे कलम १२ अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला. प्राप्त माहितीनुसार प्रथम संयुक्त अरब अमिरात येथे जाऊन तेथून पुढे संशयित निसार अहमद येमेन देशात प्रवास करून येत होता.
संपादकीय भूमिकाभारताने बंदी घातलेल्या देशात जायचे मुसलमानांचे धाडस कसे होते ? धर्मांध मुसलमान भारतातील कायदे अनेक वेळा अशा प्रकारे धाब्यावर बसवतात. त्यांच्यात राष्ट्रप्रेम नसल्याचेच हे द्योतक आहे. |