राष्ट्रध्वजाचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठवल्याप्रकरणी धर्मांधाला अटक !
निपाणी (कर्नाटक) – स्वत:च ‘ॲडमिन’ (गटाचा एक संचालक) असलेल्या एका ‘व्हॉट्सॲप’ गटाच्या अस्लम अब्दुलहमीद शिकलगार याने राष्ट्रध्वजाचे आक्षेपार्ह छायाचित्र पाठवले होते. ही माहिती मिळताच नगरसेवक दत्तात्रय जोत्रे यांनी निपाणी शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पोलिसांनी अस्लम अब्दुल हमीद शिकलगारला अटक केली. (राष्ट्रध्वजाचा अवमान होतो, हे लक्षात आल्यावर त्याविरोधात तक्रार नोंदवणारे नगरसेवक दत्तात्रय जोत्रे यांचे अभिनंदन ! प्रत्येक राष्ट्रप्रेमीने अशी कृती करणे अपेक्षित आहे ! – संपादक)