पिंपरी (पुणे) महापालिका आयुक्तपदी शेखर सिंह यांची नियुक्ती !
पिंपरी (जिल्हा पुणे) – महापालिका आयुक्त तथा प्रशासक राजेश पाटील यांच्या जागी आता सातारा जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राज्य सरकारचे अपर मुख्य सचिव नितीन गद्रे यांच्या आदेशाने राजेश पाटील यांचे स्थानांतर करून त्यांच्या जागी शेखर सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.