भरूच (गुजरात) येथील कारखान्यावरील धाडीत ५१३ किलो अमली पदार्थ जप्त !
मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाची कारवाई; एका महिलेसह ७ आरोपींना अटक
मुंबई – मुंबई अमली पदार्थविरोधी पथकाने गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील अंकलेश्वर भागातील एका अमली पदार्थाच्या कारखान्यावर धाड घातली. या धाडीत ५१३ किलो ‘एम्.डी. ड्रग्ज’ जप्त करण्यात आले.
मुंबई पोलिसांनी अंमली पदार्थ प्रकरणी गुजरातमध्ये मोठी कारवाई केली आहे#MumbaiPolice #Drugs #Gujarat #Narcotics https://t.co/npN63X3KRQ
— ABP माझा (@abpmajhatv) August 16, 2022
आंतरराष्ट्रीय बाजारात याची किंमत १ सहस्र कोटी रुपयांहून अधिक आहे. या प्रकरणी पथकाने एका महिलेसह ७ आरोपींना अटक केली आहे. येथूनच मे २०२२ मध्ये ५६ किलो, तर जुलै २०२२ मध्ये ७५ किलो अंमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. यासह जून २०२२ मध्ये गुजरातच्या सागरी भागांतून कोट्यवधी रुपयांचे अमली पदार्थ जप्त करण्यात आले होते. (वारंवार इतक्या मोठ्या प्रमाणात अमली पदार्थ सापडणे हे पोलीस आणि प्रशासन यांचे अपयशच म्हणावे लागेल ! – संपादक) गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील जाखो जिल्ह्यात सीमा सुरक्षा दल आणि कच्छ पोलीस यांनी एकत्रित कारवाई करत मोठ्या प्रमाणात हेरॉईन जप्त केले. या कारवाईत गुजरात आतंकवादविरोधी पथक आणि भारतीय तटरक्षक दल यांनी पाकिस्तानी बोटीतील ७ पाकिस्तान्यांनाही ठार केले.
संपादकीय भूमिकासंबंधितांना कठोर शिक्षा झाल्यासच अमली पदार्थ यंत्रणेचे जाळे उद्ध्वस्त होऊ शकेल ! |