रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिल्यावर जिज्ञासूंनी दिलेले अभिप्राय !
१. श्री. सुनील गुप्ता, नोएडा (उत्तर प्रदेश)
अ. ‘सनातन आश्रम अतिशय सुंदर आणि अद्वितीय आहे.
आ. सनातन धर्माला उजाळा देण्यासाठी येथे होत असलेले भगीरथ प्रयत्न अत्यंत प्रशंसनीय आहेत.
इ. अखंड भारताच्या संकल्पनेचा प्रचार आणि प्रसार होण्यासाठी आपले योगदान अप्रतिम आहे.’
(६.१.२०२२)
२. श्रीमती मीनाक्षी गुप्ता, ग्रीनस सर्वे पार्क, कोलकाता.
अ. ‘मी आश्रमात आल्यानंतर माझे मन शांत झाले.
आ. आश्रमात असेपर्यंत मला वेळेचे भान राहिले नाही.
इ. साधकांमधील नम्रता, भक्ती आणि ते करत असलेली सेवा पाहून माझे मन श्रद्धेने भरून आले.’
(१७.३.२०२२)
येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक |