‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने फरिदाबाद (हरियाणा) येथील शाळेत ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’ या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन
फरिदाबाद (हरियाणा) – ‘संतकृपा प्रतिष्ठान’च्या वतीने येथील भूर कॉलनी, सेक्टर २९ मधील ‘भारतीय विद्यानिकेतन सिनियर सेकंडरी स्कूल’मध्ये ‘तणावमुक्त जीवनासाठी अध्यात्म’, या विषयावर शिक्षकांना मार्गदर्शन करण्यात आले. या वेळी ‘शिक्षक आणि विद्यार्थी यांनी त्यांच्या जीवनाला अध्यात्माची जोड दिली, तर ते नेहमीसाठी आनंदी राहू शकतात’, असे मार्गदर्शन प्रतिष्ठानचे श्री. गुलशन किंगर यांनी केले. या वेळी शाळेच्या मुख्याध्यापिका मंजू मेहता म्हणाल्या, ‘‘अशा प्रकारच्या कार्यक्रमांचे आयोजन शाळेच्या विद्यार्थ्यांसाठीही करू.’’ या कार्यक्रमाचा लाभ अनेक शिक्षकांनी घेतला.