हापूड (उत्तरप्रदेश) येथील जिल्हा न्यायालयाबाहेर हत्येतील आरोपीची गोळ्या झाडून हत्या
हापूड (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा न्यायालयाच्या बाहेर एका आरोपीला गोळ्या घालून ठार करण्यात आले. गोळीबारानंतर मारेकरी पळून गेले. ही घटना १६ ऑगस्टला सकाळी घडली. या हत्येमागील कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. ठार झालेल्या आरोपीचे नाव लाखन उपाख्य यशराज आहे. तो हरियाणातील फरीदाबाद येथे रहाणारा होता. वर्ष २०१९ मध्ये एका हत्येच्या प्रकरणात त्याला अटक करण्यात आली होती.
हापुड़ जिला अदालत में पेशी के लिए लाए गए एक अभियुक्त पर तीन बदमाशों ने फायरिंग कर दी#Hapur #UttarPradesh #HapurDistrictCourthttps://t.co/cUZXrtL1ci
— ABP Ganga (@AbpGanga) August 16, 2022
संपादकीय भूमिकाउत्तरप्रदेशमध्ये कायदा आणि सुव्यवस्था अद्यापही पूर्णपणे सुधारलेली नाही, याचेच ही घटना द्योतक आहे ! पोलीस आणि प्रशासन यांनी अजून कठोर पावले उचलणे आवश्यक आहे ! |