मुसलमान तरुणाने हिंदु असल्याचे सांगून हिंदु युवतीवर केला ९ वर्षे बलात्कार
उत्तरप्रदेशात ‘लव्ह जिहाद’चे नवीन प्रकरण उजेडात !
शाहजहांपूर – उत्तरप्रदेशातील शाहजहांपूरमध्ये एका मुसलमान तरुणाने एका हिंदु मुलीवर ९ वर्षे बलात्कार केल्याची घटना समोर आली आहे. दानिश नावाच्या मुसलमान तरुणाने ‘अविनाश’ हे हिंदु नाव धारण करून एका हिंदु युवतीला प्रेमाच्या जाळ्यात ओढले. त्यानंतर दानिशने तिच्यावर बलात्कार केला आणि त्याच्या मित्रांनाही तसे करायला लावले. पोलिसांनी या प्रकरणी दानिशसह ६ जणांच्या विरोधात गुन्हा नोंदवला आहे.
पीडित मुलीने, ‘माझी अविनाश नावाच्या तरुणाशी भ्रमणभाषवरून मैत्री झाली. काही दिवसांनी त्याने मला भेटायला बोलावले. त्याची जीवनशैली पाहून मला तो हिंदु नसल्याचा संशय आला. चौकशीअंती तो दानिश नावाचा मुसलमान असल्याचे निष्पन्न झाले. त्याने स्वत:च्या वहिनीच्या साहाय्याने मला एका खोलीत बंद केले. तो स्वत:ची बहीण आणि वहिनी यांच्यासमोर माझ्यावर बलात्कार करत होता. त्याने माझे अश्लील व्हिडिओ बनवले. ‘मी ऐकले नाही, तर हे व्हिडिओ प्रसारित करणार’, असे धमकावून तो माझ्यावर सतत ९ वर्षे बलात्कार करत होता’, असे तक्रारीत म्हटले आहे.