पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती द्या ! – श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे निवेदन
इचलकरंजी (जिल्हा कोल्हापूर), १५ ऑगस्ट (वार्ता.) – केवळ श्री गणेशमूर्ती पंचगंगा नदीत विसर्जित केल्याने पंचगंगा नदी प्रदूषित होते, असा कयास लावणे चुकीचे आहे. हा निष्कर्ष विनाअभ्यास काढला जातो. वास्तविक पंचगंगा नदीत वर्षभर जे प्रदूषित पाणी मिसळते, ते रोखण्यास महापालिकेला अपयश आले आहे. त्याविषयी अगोदर विचार करणे अपेक्षित आहे. त्यामुळे गणेशभक्तांच्या भावनांशी न खेळता, पंचगंगा नदीत श्री गणेशमूर्ती विसर्जनास अनुमती देण्यात यावी, या मागणीसाठी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानच्या वतीने महापालिका उपायुक्त प्रदीप ठेंगल यांना निवेदन देण्यात आले. या प्रसंगी श्री. गजानन महाजन गुरुजी, श्री. प्रसाद जाधव यांसह अन्य धारकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.