लातूर, धाराशिव आणि सोलापूर जिल्ह्यांत दुचाकींची चोरी करणार्या २ आरोपींना अटक !
लातूर – रात्री गस्त घालणार्या येथील पोलिसांनी २ मोटारसायकल चोरणार्यांना पकडले असून त्यांच्याकडून १३ दुचाकी आणि ६ लाख ३० सहस्र रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. शुभम तथा सुग्रीव जरीचंद कुंभकर्ण आणि गोपाळ सखाराम माने अशी अटक केलेल्यांची नावे आहेत.
चोरट्यांकडून जप्त केलेल्या दुचाकींची पडताळणी केली असता त्या लातूर येथील गांधी चौक पोलीस ठाणे येथे नोंद असलेल्या गुन्ह्यातील असल्याचे निदर्शनास आले. आरोपींना अटक करून अधिक अन्वेषण केले असता त्यांनी लातूर येथील शिवाजीनगर, एम्.आय.डी.सी., गांधी चौक पोलीस ठाणे, धाराशिव येथील आनंदनगर पोलीस ठाणे, तसेच सोलापूर येथील फौजदार चावडी पोलीस ठाणे अशा विविध ठिकाणांहून चोरी केल्याचे सांगितले. चोरलेल्या दुचाकी अल्प दरात लोकांना विक्री करण्याचा चोरट्यांचा मानस होता. (पोलीस ठाण्यातीलच दुचाकींची चोरी होणे, हे पोलीस खात्यासाठी दुर्दैवी ! – संपादक)
संपादकीय भूमिका
|