अल्पवयीन मुलीचे अपहरण करून अत्याचार करणार्या तरुणास १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा !
अंबाजोगाई (जिल्हा बीड) – मेंदी काढण्यास शिकण्यासाठी जाणार्या अल्पवयीन मुलीला बळजोरीने पळवून नेत तिच्यावर १ मास अत्याचार करणारा बाळासाहेब तथा खंडू धनंजय वळसे याला १० वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा आणि १ लाख रुपये दंड ठोठावण्यात आला आहे. येथील सत्र न्यायालयातील डी.डी. खोचे यांनी हा निकाल घोषित केला. ही घटना ५ वर्षांपूर्वी केज तालुका येथे घडली होती. या प्रकरणी २६ एप्रिल २०१७ या दिवशी केज पोलीस ठाणे येथे खंडू याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला होता. या प्रकरणात सरकार पक्षाच्या वतीने सरकारी अधिवक्ता रामेश्वर एम्. ढेले यांनी काम पाहिले. (अशा प्रकरणांचा निकाल लवकर लावल्यास महिलांवरील अत्याचार अल्प होण्यास साहाय्य होईल ! – संपादक)