शासनाच्या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेणार्या ४३७ अधिकार्यांना ९ वर्षांत अटक !
नगर – शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी लाच घेणार्या ४३७ अधिकार्यांना लाचलुचपतविरोधी पथकाने अटक केली आहे. त्यात रोजगार हमी आणि घरकुल योजनांच्या लाभासाठी सर्वाधिक लाच मागितल्याचे सिद्ध झाले आहे. ९ वर्षांतील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या कारवायांत ४० पेक्षा अधिक कल्याणकारी योजनांत ४३७ लाचखोर अधिकार्यांना सापळा रचून अटक करण्यात आली आहे. वर्ष २०१४ ते २०२२ या कालावधीत रोजगार हमी योजनेत विविध अनुदानांसाठी लाभार्थ्यांकडून लाच मागण्याच्या १०० प्रकरणांत कारवाई झाली. नागरिकांचे घरकुलाचे स्वप्न साकारण्यासाठी ‘इंदिरा आवास’ योजना, ‘रमाई आवास’ योजना आणि ‘पंतप्रधान आवास’ योजना यांसारख्या योजनांसाठी लाभार्थींची अडवणूक होते.
संपादकीय भूमिका
|