भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवण्याचा उद्देश ! – जैश-ए-महंमदचा आतंकवादी हबीबुल
नूपुर शर्मा यांची हत्या करण्याचा कट !
फतेहपूर (उत्तरप्रदेश) – उत्तरप्रदेशच्या आतंकवादविरोधी पथकाने अटक केलेला जैश-ए-महंमदचा आतंकवादी हबीबुल इस्लाम उपाख्य सैफुल्ला याला भारताला ‘इस्लामी राष्ट्र’ बनवायचे असून त्यासाठी तो कामही करत आहे. अन्वेषण यंत्रणांना आतापर्यंत मिळालेल्या माहितीतून त्यांनी, ‘हबीबुल हा भाजपच्या माजी प्रवक्त्या नूपुर शर्मा यांच्या हत्येचा कट रचत होता’, अशी शक्यता वर्तवली आहे. सहारनपूर येथून अटक करण्यात आलेला आतंकवादी नदीम याला आत्मघातकी आक्रमण करून नूपुर शर्मा यांना मारायचे होते, असे त्याने म्हटले आहे. नदीम हा हबीबुलच्या संपर्कात होता.
“भारत में इस्लाम और नूपुर शर्मा का सर धड़ से अलग करना मेरा मकसद”…बेखौफ, निडर है हबीबुल#india #IslamicTerrorismInIndia #NupurSharma #habibul @NupurSharmaBJP https://t.co/Pxz0DJVweR
— Sudarshan News (@SudarshanNewsTV) August 15, 2022
(म्हणे) ‘जिहाद केल्यानेच स्वर्ग (जन्नत) मिळेल !
हबीबुलचे म्हणणे आहे की, ‘जिहाद केल्यानेच स्वर्ग (जन्नत) मिळेल. जगातील प्रत्येक व्यक्तीला इस्लाम स्वीकारावा लागेल. इस्लाम हा एकच धर्म आहे. जो हे स्वीकारणार नाही, त्याला ‘तालिबानी शिक्षा’ दिली जाईल.’ तालिबानी ज्या क्रूरतेने लोकांची हत्या करतात, ती पद्धत हबीबुलला आवडते. पाकिस्तानातील आतंकवाद्यांशी तो ‘टेलीग्राम’ या सामाजिक माध्यमाद्वारे संपर्कात होता. आतंकवादविरोधी पथक ‘फतेहपूर, कानपूर, तसेच देशभरातील विविध शहरांमधील कोण कोण त्याच्या संपर्कात आहेत ?’, याचा शोध घेत आहे.
संपादकीय भूमिकाहिंदूंनो, भारत पुन्हा एकदा इस्लामी राजसत्तेच्या नियंत्रणात जाण्याआधी हिंदु राष्ट्राची स्थापना करा ! |