सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांचे राष्ट्राविषयी विचार !
‘देवाला पहायला चष्मा लागत नाही आणि देवाचे बोलणे ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही. त्यासाठी फक्त शुद्ध अंतःकरण लागते. प्रजावत्सल शासनकर्ता तसाच असतो. त्याला दुःखी जनता दिसायला चष्मा लागत नाही आणि जनतेच्या समस्या ऐकू येण्यासाठी कानाला यंत्र लावावे लागत नाही !’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
‘शारीरिक, मानसिक आणि बौद्धिक स्तरांवर राष्ट्र-धर्मासाठी कार्य करून काही साध्य होत नाही, हे गेल्या ७५ वर्षांत अनेकदा सिद्ध झाले आहे. ‘आता त्यांच्या जोडीला आध्यात्मिक स्तरावरही कार्य करणे अत्यावश्यक आहे’, हे सर्वांनी लक्षात घेणे आवश्यक आहे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले
सर्वसामर्थ्यवान असूनही भारताने इतिहासात एकाही देशावर आक्रमण न करण्याचे कारण
‘भारत सोडून जगातील इतर सर्वच राष्ट्रांनी दुसर्या राष्ट्रांवर वर्चस्व गाजवण्यासाठी आपली शक्ती वापरली आहे आणि अजूनही वापरत आहेत. याउलट त्रेता आणि द्वापर या युगांत भारत जगात सर्वसामर्थ्यवान असतांनाही भारताने एकाही देशावर आक्रमण केले नाही. याचे कारण हे की, भारतातील हिंदु धर्मामुळे त्या युगांतही सर्वांचे लक्ष ईश्वरप्राप्तीकडे आणि ऋषीमुनींचे लक्ष ‘१४ विद्या आणि ६४ कला यांच्या माध्यमांतून ईश्वरप्राप्ती कशी करायची’, याकडे असे.’
– सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले