मध्यप्रदेश येथील मंदिरांत साजरा होणारा स्वातंत्र्यदिन !
मध्यप्रदेशातील उज्जैन आणि मंदसौर येथील २ प्रसिद्ध मंदिरांमध्ये स्वातंत्र्यदिन हा राष्ट्रीय उत्सव तिथीनुसार साजरा केला जातो. ही परंपरा ४५ वर्षे जुनी आहे.
गेल्या अनेक वर्षांपासून चालत आलेला हा अनोख्या स्वरूपातील उत्सव गतवर्षीही मोठ्या उत्साहात साजरा केला गेला. ‘१५ ऑगस्ट १९४७ मध्ये ब्रिटीश राजवटीपासून भारत स्वतंत्र झाला, तेव्हा हिंदु दिनदर्शिकेनुसार कृष्ण पक्ष, श्रावण मधील चतुर्दशी होती’, असे उज्जैनमधील महाकालेश्वर ज्योतिर्लिंगाजवळील बडा गणेश मंदिराचे प्रमुख श्री. आनंद शंकर व्यास यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भारतीय संस्कृतीचा प्रसार-प्रचार व्हावा; म्हणून या तिथीला विशेष पूजा केली जाते. प्रत्येक वर्षी मंदिरात श्री गणेश आणि तिरंगा यांची पूजा करण्यात येते आणि भोग-आरतीनंतर पूर्ण आदराने राष्ट्रध्वज मंदिरावर फडकावण्यात येतो. हा उत्सव पहाण्यासाठी पर्यटक मोठ्या संख्येने भेट देत असतात.
(संदर्भ – संकेतस्थळ)