स्वातंत्र्याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रहितासाठी समर्पित होऊन कार्य करा !
हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांचे आवाहन
मुंबई – हिंदु जनजागृती समितीच्या वतीने स्वातंत्र्यदिनानिमित्त हार्दिक शुभेच्छा ! भारतामातेच्या रक्षणासाठी बलीदान देणारे क्रांतीकारक आणि राष्ट्रभक्त यांचा आज स्मृतीदिन आहे. त्यांच्या स्मृती आपण विसरू नयेत.
फाळणीच्या वेळी हिंदू आणि भारतीय यांनी असंख्य कष्ट सहन केले. त्यांच्यामुळेच आज भारत संपूर्ण विश्वात नावारूपाला येत आहे. स्वातंत्र्यदिनानिमित्त आपण सर्वांनी शपथ घेऊया की, भारताचे स्वातंत्र्य आणि अखंडता टिकवून ठेवूया. राष्ट्र आणि समाज यांच्या हितासाठी कार्य करणे, हे आपले कर्तव्य आहे. स्वातंत्र्याच्या स्मृतीदिनानिमित्त राष्ट्रहितासाठी समर्पित होऊन कार्य करा, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते रमेश शिंदे यांनी केले आहे.