हिमाचल प्रदेशमध्ये आता बलपूर्वक सामूहिक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षा
शिमला (हिमाचल प्रदेश) – भाजपशासित हिमाचल प्रदेश राज्यामध्ये सामूहिक धर्मांतरविरोधी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. आता या कायद्यानुसार बलपूर्वक धर्मांतर केल्यास १० वर्षांच्या कारावासाची शिक्षाही होऊ शकते. यापूर्वी असे केल्यास ७ वर्षांची शिक्षा होत होती. १८ मासांपूर्वी ‘हिमाचल प्रदेश धर्म स्वातंत्र्य कायदा, २०१९’ संमत झाला होता. त्यामध्येच आता सुधारणा करून शिक्षेच्या कालावधीत वाढ करण्यात आली आहे. या कायद्यात आता सामूहिक धर्मांतराची व्याख्याही करण्यात आली आहे. यात ‘जर एखाद्या व्यक्तीने दोन अथवा त्याहून अधिक लोकांचा धर्म एकाच वेळी पालटला, तर ते सामूहिक धर्मांतरच्या कक्षेत येईल आणि संबंधित व्यक्तीवर याच कायद्यांतर्गत खटला चालेल’, असे नमूद करण्यात आले आहे.
Himachal Pradesh News: हिमाचल में अब सामूहिक धर्मांतरण पर होगी 10 साल की सजा, संशोधित कानून हुआ ध्वनिमत से पारित#himachalpradesh #JairamThakur #massconversioninHimachal #amendedlawpassedbyvoicevotehttps://t.co/BcfGozz4Bt
— India TV Hindi (@IndiaTVHindi) August 13, 2022
संपादकीय भूमिकाबलपूर्वक धर्मांतर केल्यास शिक्षा होणे, हे जरी योग्य असले, तरी मुळात धर्मांतर करताच येऊ नये, यासाठी कठोर कायदा करण्याची आवश्यकता आहे आणि तो केंद्र सरकारने करण्याची आवश्यकता आहे ! |