आमीर खान यांच्यानंतर आता अभिनेते शाहरुख खान यांच्या ‘पठाण’ चित्रपटावर बहिष्कार घालण्याची मागणी
ट्विटरवर ‘#BoycottPathan’ हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ !
(‘हॅशटॅग ट्रेंड’ करणे, म्हणजे एकाच विषयावर चर्चा घडवून आणणे)
नवी देहली – अभिनेते आमीर खान यांचा ‘लाल सिंह चढ्ढा चित्रपटावर सामाजिक माध्यमांतून बहिष्कार घालण्याचे अभियान राबवण्यात आल्यानंतर या चित्रपटाला थंड प्रतिसाद मिळाला आहे. यानंतर आता अभिनेते शाहरूख खान यांच्या आगामी ‘पठाण’ या चित्रपटावर बहिष्कार घालण्याचे आवाहन सामाजिक माध्यमांतून केले जात आहे. ट्विटरवर ‘#BoycottPathan’ हा ‘हॅशटॅग ट्रेंड’ चालवण्यात आला; मात्र या बहिष्कारामागील कारण समजू शकलेले नाही. हा चित्रपट २५ जानेवारी २०२३ या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
After #BoycottLaalSinghChaddha trend, social media users target #ShahRukhKhan’s #Pathaan https://t.co/NFJBvjOf6A
— DNA (@dna) August 14, 2022
ट्विटरवर काही जणांनी म्हटले आहे की, हा बहिष्कार या चित्रपटात अभिनेत्री दीपिका पदुकोण यांची भूमिका असल्याने करण्यात येत आहे. तिने यापूर्वी जे.एन्.यू.मध्ये साम्यवादी विचारसरणीच्या विद्यार्थी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता.